गांधी मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नूरुद्दीन मुल्लाजी सन्मानित
एरंडोल (प्रतिनिधी) नितिन ठक्कर
येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना गांधी मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
त्यांच्या सामाजिक कार्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन होप फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्ट मुंबई यांचे फाउंडेशन प्रेसिडेंट एडवोकेट डॉ, शेख अहमद यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
यापूर्वीही त्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
येथील समाज सेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना गांधी- मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा भोळे यांनी त्यांना अभिनंदन पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले दिल्या आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा