यावल शहरात कॉंग्रेस पार्टी तर्फे आयोजित डिजीटल मेंबर शिप सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात :

यावल दि.१५ अमीर पटेल

महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मा. श्री. आमदार शिरीष दादा चौधरी आणि, जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीपराव पवार यांच्या आदेशाने यावल शहर काँग्रेस कमिटी चे शहराध्यक्ष कादिर खान यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित डिजिटल मेम्बरशीप सद्स्य नोंदणी अभियान तालुका अध्यक्ष मा. श्री. प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि इंटक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री. भगतसिंग बापू पाटील, फैजपूर न. पा. गटनेते श्री. कलिम भाई मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकी संघ येथे सदस्य नोंदणी राबविण्यात आले. यावेळी मुख्य नोंदणी कर्ता श्री. अजय बढे, कोरपावली सरपंच श्री विलास अडकमोल, माजी नगरसेवक पुंडलिक बारी, जिल्हा उपाध्यक्ष अनू. जाती जमाती श्रीमती चंद्रकला ताई इंगळे, सद्दाम शाह, शहर उपाध्यक्ष श्री. अनिल जंजाळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष श्री. सैय्यद इखलियास, अल्पसंख्याक शहराध्यक्ष श्री. रहेमान खाटीक, सेवा फाउंडेशन शहराध्यक्ष नइम शेख, नगरसेवक श्री. समीर खान, विक्की गजरे, पुंडलिक महाराज, प्रदीप पाटील, शेक सकलेन, शेक अजहर, विनोद सोनवणे, शेक अवेश, उस्मान खान, पंकज अनहोते, अय्युब भाई, अभिषेक इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी बूथ कमिटी सदस्यांनी आपले नाव नोंदणी करून डिजिटल सदस्य नोंदनि करून आज पासून नोंदणी अभियानाची सुरुवात यावल तालुक्यात झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?