अकोला आजचा निर्णय सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात निर्दोष सुटका

                                         अकोला आजचा निर्णय

 सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात निर्दोष सुटका

सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात अब्दुल मन्नान अब्दुल गफार याची आज रोजी 3 रे अतिरिक्त सत्र न्यायालय, अकोला ने निर्दोष सुटका केली. 

दि. 11.11.2016 रोजी महावितरण ने बोरगाव मंजु पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती की दाळंबी रोड वरील शालीमार ढाब्याचे मालक अब्दुल मन्नान अब्दुल गफार  यांनी महावितरणच्या कर्मचार्यांना शिवीगाळ करत धक्का बुक्कि केली. महावितरण चे कर्मचारी तेथे थकित बिल न भरल्या कारणाने मिटर कनेक्शन कट करण्यासाठी आले होते परंतु अब्दुल मन्नान याने त्यांना शिवीगाळ करत धक्का बुक्कि केली. बोरगाव मंजु पोलीस स्टेशन ने कलम 353, 323 व 294 भा द वि अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 

सर्व साक्षीदारांच्या तपासणी नंतर आज रोजी 3 रे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डि. बी. पतंगे साहेबांनी पुराव्या अभावी आरोपी ची निर्दोष सुटका केली. आरोपी तर्फे अधिवक्ता मोहम्मद युसुफ (नोटरी) व अधिवक्ता मोहम्मद अतिक ईकबाल यांनी यशस्वी बाजू़ मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?