युक्रेन मधील विद्यार्थ्याच्या मृत्यस पंतप्रधान मोदीच जबाबदार ...जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे**राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मेल व्दारे पाठवले निवेदन....*
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
जळगाव--- काल संपूर्ण भारत देशासाठी अत्यंत दुर्दैवी दिवस होता.. युक्रेन मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम साठी शिक्षण घेत असलेला कर्नाटक राज्यातील शेखरअप्पा ह्या विद्यर्थ्याचा रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला..या मृत्यू ला जबाबदार कोण ..?
*भारताचे पंतप्रधान प्रचारात व विरोधकांना ईडी लावण्यात व्यस्त*
भारत देशाचे युक्रेन मध्ये 16000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गेले 5 दिवस युद्ध सुरू आहे परंतु आता पर्यंत फक्त 216 विद्यार्थ्यांना भारत सरकार भारतात सुखरूप आणू शकले. भारताचे पंतप्रधान मात्र प्रचारात व विरोधकांना ईडी लावण्यात व्यस्त आहे. परराष्ट्र खात्याचा अजूनही कुठलाही संपर्क केला नाही . सुमारे 550 विद्यार्थी बेपत्ता आहे परराष्ट्र खात कुठे आहे ? असं म्हणण्याची वेळ आली आहे त्यामुळेच काल मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदीच जबाबदार आहे त्यांची जबाबदारी असतांना ते पूर्ण करू शकले नाही त्यामुळेच त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली
*राष्ट्रपतींना मेल व्दारे पाठवले निवेदन*
जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी मेल व्दारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिले आहे की युक्रेन मधील विद्यार्थ्यांना सुखरूप रित्या भारतात आणण्यास पंतप्रधान मोदी व परराष्ट्र खात अयशस्वी ठरले आहे त्यामूळे आपण भारत सरकार म्हणून जबाबदारी घ्यावी व संपूर्ण विद्यार्थ्यांना आपल्या मायभूमीत सुखरूप परत आणावे ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आले.. अन्यथा विद्यार्थ्यांसाठी एन एस यु आय व काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा