*रवंजे बु! येथे युवकाची गळफास घेत आत्महत्या..!*
अमीर पटेल
एरंडोल: तालुक्यातील रवंजे बु! येथे सिकंदर उस्मान खान वय-२२वर्षे या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जिवनयाञा संपवल्याची घटना ३मार्च २०२२ गुरूवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
नैराश्य,प्रेमप्रकरण/एकटेपणा या कारणास्तव सदरील युवकाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक कयास आहे.
याबाबत समजलेली माहीती अशी की,
सिकंदर हा मूळ जळगाव येथील राहणारा होता, तो रवंजे बु! येथे त्याचे मामा बिस्मिल्ला गफुर मुसलमान यांच्याकडे राहत होता.
तो हातमजुरी करीत होता.
याप्रकरणी राञी उशिरा पर्यंत एरंडोल पोलिस स्टेशन ला नोंद करण्याचे काम सुरू होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा