दि. ०८/०३/२०२२ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आल्या बाबत.

आज दिनांक ०८/०३/२०२२ रोजी मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मॅडम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे उपस्थितीत जागतिंग महिला दिन साजर करण्यात आला. त्या अनुषंगाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथील महिला पोलीस अंमलदार निता सनके यांना वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथील पोलीस निरीक्षक या पदाचा कार्यभार सांभाळण्यास देण्यात आले तसेच महिला पोलीस नाईक दिपाली नारनवरे, महिला पोलीस नाईक वैशाली रणवीर, मपोशि पुजा दांडगे व मपोशि अश्विनी माने यांना शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथील पोलीस उपनिरीक्षक पदाचे कार्यभार देण्यात आले.

जागतिक महिला दिन निमीत्त लॉयन्स क्लब अकोला हार्मोनी अकोला वतीने सकाळी ११:०० वाजता शहर वाहतुक शाखा येथील कार्यरत सर्व महिला अंमलदार यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम अशोक वाटिका चौक अकोला येथे आयोजीत करण्यात आले होते. लॉयन्स क्लब अकोला हार्मोनी तर्फे अकोला अध्यक्ष लायन श्रीमती ज्योति गोयनका, सचिव लायन श्री सत्यपाल बासानी, कोषाध्यक्ष लायन श्रीमती यासमीन अली, क्लब विस्तार अधिकारी लायन श्री कौशल 3 भाटीया, लायन श्री दर्शन गोयनका, श्रीमती नुतन जैन, श्रीमती भगवती गांधी, श्रीमती प्रियंका जैन, श्रीमती सुरेखा मॅडम इत्यादी मान्यवरांनी अशोक वाटीका चौक येथे येवुन श्री विलास पाटील पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक नियंत्रणा शाखा अकोला यांचे उपस्थीतीत शहर वाहतुक नियंत्रण शाखा येथील कार्यरत महिला अंमलदार दिपाली नारनवरे, निता सनके, वैशाली रणवीर, पुजा दांडगे, अश्विनी माने, करीष्मा चव्हाण, व सोनल वानखडे इत्यादींना प्रत्येकी वॉटर बॉटल, डायरी, पेन, स्कार्फ, सॅनीटायझर, पुष्पगुच्छ सोबत मिठाई व चॉकलेट देवुन सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?