हीरोइन ड्रग्स जप्तीच्या अकोला येथील NDPS केस मध्ये ज़ामिन
प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय अकोलाने आज रोजी 510 ग्रॅम हीरोइन ड्रग्स जप्तीच्या NDPS केस मध्ये आरोपी रहीम खान, वय 67 वर्ष, यास ज़ामिन दिली. तो 22 अक्टूबर 2021 पासून गजाआड होता.
घटना अशि कि 20 अक्टूबर 2021 रोजी अकोट फैल पोलीस स्टेशन ला गुप्त माहिती मिळाली कि अफजल खान हा अकोट फैल येथे हीरोइन ड्रग्स गुप्त रित्या विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी अफजल खान यास त्याचे राहते घरामधून संशयित 510 ग्रॅम हिरोईन ड्रग्स सह अटक केले. अफजल खान ने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबूली देत जप्त माल हा रहीम खान याचा असून तो रोज मजूरी वर विकण्याचा काम करत असल्याचे सांगितल्या प्रमाणे रहीम खान यास 22 अक्टूबर 2021 रोजी अटक करण्यात आले. तेव्हापासून तो गजाआड होता.
अधिवक्ता मोहम्मद युसुफ (नोटरी) व अधिवक्ता मोहम्मद अतिक ईकबाल
यांनी रहीम खान चा जामिन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये दाखल केला व यशस्वी रीत्या युक्तिवाद केला आणि अंति आज रोजी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने रहीम खान चे जामिन अर्ज स्विकारत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा