पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भोरटेक जवळील ट्रक आणि बसचे अपघात :आठ जण जखमी

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल यावल : तालुक्यातील भोरटेक जवळ ट्रक आणि बसचा समोरासमोर अपघात घडला असून यात आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. जखमींना गोदावरी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. भोरटेक ता. यावल जवळ बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रावेर एसटी आगाराची बस क्रमांक एम. एच. 40 एन.9063 ही प्रवासी घेऊन जळगाव कडून रावेरला जात होती दरम्यान फैजपूर कडून भुसावळ कडे ट्रक क्रमांक यु. पी.80 सी. टी. 7536 हा जात असताना या दोघांची समोरासमोर धडक झाली यामध्ये आठ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने घटनास्थळावरून गोदावरी हॉस्पिटल ला उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

हज्जन कुलसुमबी उर्दू शाळेच्या रेकॉर्डची सत्यता पडताळणी करून शाळेची मान्यता रद्दची मागणी.अल्पसंख्यांक मंत्री मा.ना.जितेंद्र आव्हाड यांना निवेदन.

इमेज
सन पासुन २००६ पर्यंत सुरू असलेली शाळा,२००९ ते २०११ पर्यंत नूतनीकरणासह वर्ग परवानग्या देतांना सुरू असलेली शाळा दि, २०/८/२०११ रोजी प्रथमता सुरू केलेली शाळा,दि,२६/१०/२०१७ रोजी शाळेला आरटीई देण्यास शिफारस करतांना तपासलेली शाळा,व शाळेला प्रथम मंडळ मान्यता व सांकेतिक क्रमांक देण्यासाठी पाठविलेल्या शिफारशी अहवालानुसार २०१७-१८ मध्ये तपासणी केलेली शाळा,या सर्व वर्षात सुरू असलेल्या शाळाबाबतच्या संपूर्ण रेकॉर्डची सत्यता पडताळणी करण्यासाठी राज्याचे विद्यमान गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री मा.ना.जितेंद्र आव्हाड यांना प्रत्यक्ष भेटून अलअमीन संस्थेच्या संस्थापक संचालकांनी निवेदन दिले आहे लक्षणीय बाब म्हणजे सं स्था स्थापनेपासून अलअमीन या संस्थेने हज्जन कुलसु मबी नावाची शाळा आजपर्यंत सुरुच केली नसून या नावाच्या  शाळेचे ठराव करून प्रस्ताव ही पाठवलेले  नसल्याने शाळे विरोधात आता पर्यंत सर्वशिक्षण विभागापासून मंत्रालया पर्यंत तब्बल ११० निवेदने रवाना झाली आहेत.     सदर शाळेच्या सर्वमान्यतेबाबत कागदपत्रांची साशंकता असल्याने शाळा बंद करावी किंवा कसे यावलचे तत्कालीन गट,शि.अ. यां...

ओला व सुका घनकचरा अनियमित संकलन.वाहनाचा आवाज येत नसल्याने नागरिक संभ्रमात आणि ठेकेदाराची चांदी.

इमेज
यावल अमीर पटेल  ओला व सुका घन कचरा संकलन करून वाहतूक करण्याचा ठेका यावल नगरपालिकेतर्फे एका ठेकेदाराला देण्यात आला आहे, ठेकेदाराचे स्थानिक कर्मचारी मात्र ओला व सुका घनकचरा दररोज संकलित न करता एक दिवसाआड़ किव्वा दोन दिवस आड आणि ते सुद्धा अवेळी, अनियमित संकलित करून सोयीनुसार वाहतूक करीत असल्याने तसेच घंटागाडीचा आवाज(घनकचरा संकलन करण्याची रेकॉर्डिंग)बंद असल्याने नागरिकांना समजून येत नसल्याने यावलकर संभ्रमात पडले असून ठेकेदाराची मात्र चांदी होत आहे, याकडे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी लक्ष केंद्रित करून ठेकेदारावर कार्यवाही करून पेमेंटची कपात करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.         याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरातील ओला व सुका घन कचरा वाहतूक करण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या बाहेरील एका ठेकेदाराला देण्यात आला आहे,परंतु प्रत्यक्ष काम मात्र स्थानिक काही ठेकेदार करीत असून या दुर्गंधीयुक्त ओला व सुका घन कचऱ्यातील टक्केवारी मनसोक्त खात असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे. ठेकेदाराकडून नागरिकांच्या माहितीसाठी घंटागाडीवर ओला व सुका घन कचरा ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आबिद कच्ची यांचा राजीनामा

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लीम बांधवांच्चा मस्जितेवर भोगे काढायला सांगितले नाही तर आम्ही तिथे दुप्पट आवाजाने भोगे लावून हनुमान चालीसा लावणार असे अपशब्दा मुळे मुस्लिम बांधवांच्चा मन :दुखवण्यात आले आहे तरी उपशहाराध्यक्ष आबिद कच्ची यांची  दि. २०१२ मध्ये निवड करण्यात आली होती तर २०२१ मध्ये यावल तालुका जनहित उपशहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती तरी आबिद कच्ची यांनी आपले राजिनामा पत्रकान्य कळवले

पोलीस निरीक्षक पदी आयपिएस आशित कांबळे यांची स्वीकारला पदभार

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल यावल पोलीस स्थानकात १५ महिन्यापासून कार्यकरत असलेले पो. नि. सुधिर पाटील यांची विनंती वरून नाशिक येथे बदली झाली त्यांच्चा रिक्त झालेल्या जागेवर पो. नि. म्हणून परिक्षाविधीन (आयपिएस ) अधिकारी आशित कांबळे यांनी पदभार स्विकारले . यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी बोलतांना सांगीतले की , आपण आपल्या कार्यक्षेत्रात बेशिस्तपणा, व गुन्हेगारी , शेतकऱ्यांच्चा पिक नासाडिचा प्रश्न , वाढलेल्या अवैध धंद्यांच्चा बिमोड करणार असूण ही अवैध धंदे कायमची बंद व्हावी असे आपले प्रयत्न राहणार आहे . त्याच बरोबर बेशिस्त झालेल्या शहरातील मुख्य बाजार पेठेतील वाहतुकीस शिस्त लावणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले