हज्जन कुलसुमबी उर्दू शाळेच्या रेकॉर्डची सत्यता पडताळणी करून शाळेची मान्यता रद्दची मागणी.अल्पसंख्यांक मंत्री मा.ना.जितेंद्र आव्हाड यांना निवेदन.
सन पासुन २००६ पर्यंत सुरू असलेली शाळा,२००९ ते २०११ पर्यंत नूतनीकरणासह वर्ग परवानग्या देतांना सुरू असलेली शाळा दि, २०/८/२०११ रोजी प्रथमता सुरू केलेली शाळा,दि,२६/१०/२०१७ रोजी शाळेला आरटीई देण्यास शिफारस करतांना तपासलेली शाळा,व शाळेला प्रथम मंडळ मान्यता व सांकेतिक क्रमांक देण्यासाठी पाठविलेल्या शिफारशी अहवालानुसार २०१७-१८ मध्ये तपासणी केलेली शाळा,या सर्व वर्षात सुरू असलेल्या शाळाबाबतच्या संपूर्ण रेकॉर्डची सत्यता पडताळणी करण्यासाठी राज्याचे विद्यमान गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री मा.ना.जितेंद्र आव्हाड यांना प्रत्यक्ष भेटून अलअमीन संस्थेच्या संस्थापक संचालकांनी निवेदन दिले आहे लक्षणीय बाब म्हणजे सं स्था स्थापनेपासून अलअमीन या संस्थेने हज्जन कुलसु मबी नावाची शाळा आजपर्यंत सुरुच केली नसून या नावाच्या शाळेचे ठराव करून प्रस्ताव ही पाठवलेले नसल्याने शाळे विरोधात आता पर्यंत सर्वशिक्षण विभागापासून मंत्रालया पर्यंत तब्बल ११० निवेदने रवाना झाली आहेत.
सदर शाळेच्या सर्वमान्यतेबाबत कागदपत्रांची साशंकता असल्याने शाळा बंद करावी किंवा कसे यावलचे तत्कालीन गट,शि.अ. यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवून मार्गदर्शन मागितल्याने शाळा चालकांचे धाबे दणाणले आहे, तसेच२०१२-१३ ते२०१७-१८ पर्यंत शाळेबाबतचे कोणतेही रेकॉर्ड दिसून आलेले नाही असे जि.प.जळगावच्या तत्कालीन उप.शि.अ,(माध्य) श्रीमती के.डी. चव्हाण यांनी तर शाळा भेटीच्या वेळी२००९ते२०१२या कालावधी मधील कोणतेही शालेय रेकॉर्ड जनरल रजिस्टर इ,आढळून आले नाही असे जि.प.जळगावचे विद्यमान उप.शि.आ (माध्य) श्री देवांग यांनी नमूद केले आहे रा ज्यात सुरु असलेल्या बोगस टिईटी प्रमाणपत्र चौकशी व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या मान्यता व शालार्थ आयडी अर्थात बोगस वैयक्तिक मान्यतेची चौकशी प्रमाणे सदर हज्जन कुलसुमबी उर्दू शाळेच्या वरील वर्षातील शाळेबाबतच्या संपूर्ण रेकॉर्डची सत्यता पडताळणी करुन शाळेबाबतच्या रेकॉर्डची सत्यता झाल्यास अलामिन या संस्थेच्या संस्थापक सदस्यावर कारवाई करावी सत्यता पडताळणी न झाल्यास हज्जन कुलसुमबी उर्दू हायस्कूल भालोद ता.यावल या शाळेची मान्यता तात्काळ रद्द करून शाळेवर कडक कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा