अकोला जिल्हा पोलीस दलातील होणाऱ्या भरती प्रक्रीयेमधील आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखेत वाढ
अकोला(आसिफ खान)
अकोला – महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३/०६/२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, अकोला यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई एकूण पदे ३२७ व चालक पोलीस शिपाई एकुण पदे- ३९ भरती बाबत दिनांक ०६/११ / २०२२ रोजीच्या जाहीरातीमध्ये आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे स्विकारण्याची अंतिम मुदत दिनांक ३०/११/२०२२ ही होती. आवेदनपत्र स्विकारण्याच्या दिनांकांत वाढ करण्यात आली असुन त्याऐवजी आता दिनांक १५/ १२ / २०२२ पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा