पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कार्ला शिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कार्ला शिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ
पातुर से (आसिफखान)
पातुर : तालुक्यातील कार्ला शिवारात शेतातील विहिरीत एक इसम मृतावस्थेत असल्याचे आज स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
शुक्रवार रोजी पातूर तालुक्यातील आलेगाव पासून जवळ असलेल्या कार्ला शिवारात, शिवराम श्याम खुळे यांच्या शेतातील विहिरीत एक इसम मृतावस्थेत पडून असल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असता घटनेची माहीती त्यांनी आलेगाव पोलिसांना दिली.सदर माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला असता मृतकाचे नाव बंडू डाखोरे रा. सावरगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.सदर मृतक हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता आज त्याचा मृतदेह सापडल्यानंतर सदर इसमाची हत्या की आत्महत्या हे गूढ कायम असून पोलीस त्यादिशेने तपास करीत आहेत.
दरम्यान पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहीरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, पातूर पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा