ट्रक व डिझेल टँकरची समोरासमोर धडक होऊन टँकर चालक गंभीर जखमी
ट्रक व डिझेल टँकरची समोरासमोर धडक होऊन टँकर चालक गंभीर जखमी
अकोला आसिफ खान
बाळापूर राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा ते कलकत्ता ढाब्या रोडवरी ट्रक व डिझेल टँकरची समोरासमोर धडक होऊन टँकर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
राष्ट्रीय महामार्गावर जीजे -४०५० च्या ट्रकचालकाने आर जे ०९ सी १०६० क्रमांकाच्या टँकरला जबर धडक दिल्याने टैंकर चालक गंभीर जखमी झाला. या चालकाला अकोला येथे सर्वोपचार रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले.
यामहामार्गावर गाड्यांची दोन ते तीन किलोमीटर रांग लागली होती. बाळापूर पोलीस व महामार्ग पोलीस अपघातस्थळी दाखल झाले नंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा