अकोल्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला


 अकोल्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला



अकोला से आसिफ

अकोल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख राजेश

मिश्रा तथा माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्यावर प्राण घातक हल्ला

करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे

जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हरीहर पेठ भागात रविवारी अकरा वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे

जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी

दिली आहे.


आज सकाळच्या सुमारस नालीचे बांधकाम सुरू असताना किरकोळ वाद झाला. त्यानंतर किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांचाही जखमींमध्ये समावेश आहे. मध्यस्थी करणारा पोलिस कर्मचारी शेख रशीद हे देखील जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जुना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे हे घटनास्थळा जवळच एका कार्यक्रमात असल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनीही पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?