नियंत्रण भ् शाखा अकोला मार्फत विशेष मोहिम राबवून अशोक वाटिका बस स्टँड रेल्वे स्टेशन रस्त्यावर बेशिस्तपणे उभे असलेल्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करीत असलेल्या ऑटोचालक व लक्झरी बसेस वाहनचालक विरुध्द करण्यात आली कठोर दंडात्मक कारवाई
नियंत्रण भ् शाखा अकोला मार्फत विशेष मोहिम राबवून अशोक वाटिका बस स्टँड रेल्वे स्टेशन रस्त्यावर बेशिस्तपणे उभे असलेल्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करीत असलेल्या ऑटोचालक व लक्झरी बसेस वाहनचालक विरुध्द करण्यात आली कठोर दंडात्मक कारवाई
शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला दिनांक 05/12/2022अ
अकोलाशहरातील अशोक वाटिका चौक पासून टॉवर चौक मार्गे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या मार्गावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारे लक्झरी बसेस तसेच ऑटो रिक्षा बेशिस्तपणे रस्त्यावर कोठेही उभी राहतात, ज्यामुळे मुख्यमार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असते. सदर बाबत नागरिकांच्या तक्रारी शहर वाहतूक शाखा कार्यालयात प्राप्त झालेले आहेत.
त्या अनुषंगाने शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचे मार्फत अशोक वाटिका चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर बेशिस्तपणे रस्त्यावर उभी असलेल्या एकूण 06 लक्झरी बस चालक तसेच 22 ऑटो रिक्षा चालक यांचे विरुद्ध मोटर वाहन कायदा अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच लक्झरी बसेस व्यवस्थापक यांना 149 अन्वये नोटीस बजावण्यात आली असून 1,60,000 /- रुपये दंड शासन जमा करण्यात आला आहे.
सदर प्रकारची कारवाई भविष्यातही अशीच सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक विरुद्ध कठोर स्वरूपात कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
तरी शहरातील सर्व वाहतूक करणाऱ्या वाहनधारक यांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहने चालवावी. शहरातील लक्झरी बसेस चालकांनी आपली वाहने बस स्टँडच्या 200 मीटरच्या परिसरात उभी करू नये. लक्झरी बसेस मुळे इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊनच आपली वाहने आपल्या खाजगी जागेतच उभी करावी. अकोला शहरातील वाहतूक सुरळीत राहणे करिता पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन श्री विलास पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा