इंसानियात जोडो अभियान रॅली पोहचली अकोल्यात
इंसानियात जोडो अभियान रॅली पोहचली अकोल्यात
(Asif khan)
इंसाफ लाओ देश बचाओ,भारत वासियो नफरत मिटाओ
सर्वधर्मीय धर्मगुरू बसले मांडीलामांडी लावून एकाच विचारपीठावर
अकोला ---देशात जातीय दंगली उसळण्यासाठी एक जातीवाचक ठिणगी महत्वाचे काम करते याचा फायदा देशातील राजकिय लोक करीत असतात मात्र सर्व धर्मात भाईचारा ,बंधुता आणि शांतता नांदावी अशी शिकवण सर्वच धर्मांच्या संस्थापकांनी आणि त्या त्याधर्मांच्या धर्मग्रंथात लिहून ठेवली आहे मात्र तरीही जातीयवाद अधूनमधून उफळतच असतात असे प्रकार पूर्णपणे थांबले पाहिजेत यासाठी नागपूर येथील मुफ्ती सलीम यामनी चाऊस यांनी इंसानियत अभियान रॅली काढून गढूळ होणारे धार्मिक वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला त्यानुसार शिवजयंती दि 19 फेब्रुवारीला नागपूर येथून रॅली प्रारंभ केली असून ही रॅली आज दि 22 फेब्रुवारी रोजी अकोल्यात आली असून सर्वधर्मीय लोकांच्या मनात भाईचारा वाढावा म्हणून अकोल्यात आयोजित कार्यक्रमात सर्वधर्मीय धर्मगुरू मांडीलामांडी लावून एकाच विचारपीठावर बसून ।इंसाफ लाओ ,देश बचाओ,भारतवासियो नफरत मिटाओ चा संदेश देत होते
इंसानियात अभियान रॅली निमित्ताने मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती सलीम यामनी चाऊस स्वतः तर बौद्ध धम्मगुरु महास्थाविर विजयकीर्ती , भन्ते सुर्यकिर्ती, ख्रिश्चन धर्माचे पास्टर डेव्हिड, हिंदू धर्मातील मरि माता मंदिर पुजारी गजानन सावंत , तर शीख धर्मगुरू हे सर्व एकाच विचारपीठावर मांडीला मांडी लावून बसले आणि आम्ही भारतीय एकत्र आहोत आणि राहू असा संदेश देत होते
हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन आणि बौद्ध यांच्यातील कोण्या कोपऱ्यात असलेला द्वेष मिटवून माणुसकी आणावी लागेल. यासाठी आम्ही सर्व भारतीय आहोत. आमचा धर्म आणि राजकीय पक्ष वेगळा वेगळा असू शकतो. पण न्याय आणि मानवतासमाज आणि देश एकच आहे आपले धर्म आणि पक्ष वेगवेगळे आहेत मात्र लोकांना मानवता, न्याय आणि एकता तसेच अखंडता आवडते त्यांनीच भारत घडवला आहे त्यासाठी इन्सानियत।अभियानाचे उद्देश लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जावेत यासाठी ही रॅली आली आहे ही रॅली शिवजयंती दिनी नागपूर येथून प्रारंभ केली आहे आणि मुंबई पर्यंत जातांना विविध शहरात पायी रॅली काढण्यात येत असून याद्वारे अखंडतेचा संदेश दिला जातो आहे आज दि 22 फेब्रुवारी रोजी ही रॅली अकोल्यात आली असून अकोट फैला मधील अब्दुल कलाम आझाद चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजक आसिफ अहमद खान, प्रभाकर वानखडे यांनी सर्व धर्माचे धर्मगुरू एकत्र आणले आहेत या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते अ सलाम हे होते तर नासीर खान उर्फ बाबा धाबेकर, गणेश मानकर, रणजित वाघ,शे नफिस, महंमद अल्ताफ ,शे हुसैन, अब्रार खान,शे जुबेर, शे नौशाद ,सनी वाळके,शे कय्यूम ,विजू करील,सदिकभाई उर्फ गुड्डु, नोमान खान,इमरान शाहा आदि सामाजिक कार्यकर्ता यांनी समाजसमाजातील वैर संपावे यासाठी इंसानियात अभियान रॅली सारखा कार्यक्रम आयोजित करून समाजात कायम शांतता नांदावी यासाठी परिश्रम घेत आहेत या कार्यक्रमाचे सूत्र संचलन जमिल खान यांनी केले तर आभार प्रदर्शन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा