पुन्हा एका शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पुन्हा एका शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

                (Asif khan)

बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम आगर, येथील जवळच असलेल्या खेकडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना सोमवारी 06 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
बाबुराव आनंदा गोपनारायण वय 65 हे खेकडी येथील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी घरासमोरील झाडास सोमवारी 06 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या मुलगा विजय बाबुराव गोपनारायण यांनी उरळ पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार पोलीस कर्मचारी शिवानंद मुंळे, पोलीस अंमलदार हरिहर इंगळे यांच्यासह खेकडी येथे दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला असून याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?