शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातील पोलीस अमंलदार उमेश भाकरे हे ठरले विदर्भ

 शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातील पोलीस अमंलदार उमेश भाकरे हे ठरले विदर्भ

(Asif khan) 

श्री २०२३ चे मानकरी अकोला जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोलीस अमंलदार उमेश राजेश भाकरे वय २७ नेमणुक - पोलीस मुख्यालय अकोला यांनी हे पोलीस दलात नियुक्तीस असुन पोलीस दलातील आपले कर्तव्य बजावुन आपले शरीर सौष्ठव राखुन आपले शरीरावर अतोनात मेहनत करून कौलखेड अकोला येथे दिनांक २६.०२.२०२३ रोजी विदर्भ बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस असोसिएशन यांनी आयोजीत केलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत विर्दभातुन प्रथम क्रमांक पटकावुन विदर्भ श्री २०२३ चे मानकरी ठरले आहेत.


तसेच त्यांनी सन २०२२ २०२३ या कालावधी मध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे खालील प्रकारची अनेक स्पर्धा जिंकली आहे. १) दिनांक ११.०१.२०२३ रोजी पुणे येथे महाराष्ट्र पोलीस गेम (IDC) चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन


२) दिनांक ११.१२.२०२२ रोजी बुलढाणा जिल्हयामध्ये विदर्भ श्री २०२२ चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन


३) दिनांक १६.०२.२०२३ रोजी महाण जि. अकोला येथे आयोजीत अकोला वाशिम जिल्हा स्तरीय चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन


४) दिनांक २१.०२.२०२३ रोजी मोठी उमरी अकोला येथे आयोजीत छत्रपती श्री चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन


तसेच विदर्भ श्री मध्ये ०४ वेळा बेस्ट पोजर चा मान मिळवला आहे.


पोलीस अमंलदार यांना मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. संदीप घुगे यांचे हस्ते पुष्प गुच्छ व प्रशस्तीपत्र देवुन त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. अकोला जिल्हा पोलीस दलाचे नावलौकीक केले आहे. करीता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांनी त्यांना अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?