मुस्लिम बांधवांकडून शब-ए-बारात पोलीस बंदोबस्तमध्ये
मुस्लिम बांधवांकडून शब-ए-बारात पोलीस बंदोबस्तमध्ये
(अकोला आसिफ खान)
अकोला - शब-ए-बारात ही मुस्लिमांसाठी पवित्र रात्र आहे. शब-ए-बारातच्या दिवशी मशिदी आणि कब्रस्तान विशेष सजवले जातात. मुस्लिम समाजातील लोक शब-ए-बारातला मध्यरात्री पर्यंत कब्रस्तान आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करतात आणि त्यांच्या पापांची क्षमा अल्लाह ला मागतात. इस्लाममध्ये शब-ए-बारातला विशेष महत्त्व आहे. शब-ए-बारात ही पवित्र रात्र आहे. या दिवशी कब्रस्तान अल्लाहची पूजा केली जात असते आणि तिलावत म्हणजे कुराणाच्या श्लोकांचे पठण करून सखावत म्हणजे दान केले जाते .
स्थानिक अकोट फाईलमध्ये शब-ए-बारात निमित्त मुस्लिम कब्रस्तान आणि ईदगाह ट्रस्ट, अकोटफाईलच्या वतीने शब-ए-बारातसाठी संपूर्ण कब्रस्तान स्वच्छतेची ,पाण्याची व्यवस्था केली होती शब-ए-बारातसाठी
कब्रिस्तान येणारे मुस्लिम समाजातील नागरिक प्रथम येथील मशिदीत नमाज अदा करतात, ज्यांचे पूर्वजांचे स्मरण करतात व ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी पुष्पहार घालून दर्शन घेतात. दरवर्षी मुस्लिम कब्रस्तान आणि ईदगाह ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून चांगली व्यवस्था केली जाते. यावेळी अकोट फाईल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही चोख होता . ट्रस्टने चांगली यंत्रणा केलीआहे, त्यामुळेच महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन नागरिकांच्या कामाचे कौतुक करत आहेत. या वेळी SDPO सुभाष दुधगावकर यांनी शब-ए-बरात निमित्त अकोट फाइल ,नायगाव मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टला भेट दिली. ट्रस्टच्या वतीने एसडीपीओ सुभाष दुधगावकर यांचे स्वागत करण्यात आले होते. यावेळी नायगाव अकोट फाईल येथील मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष शेख बशीर शेख गफार, उपाध्यक्ष जियाउल्ला खान रहिम खान, सचिव अब्दुल मुनाफ, कोषाध्यक्ष अमानुल्ला खान, सहसचिव अब्दुल कादर, सल्लागार मोहम्मद खान ,कमाल सिद्दीकी, शेख आरिफ, अब्दुल जहीर, शेख शरीफ, शेख रफिक, सलीम खान, फिरोज खान, अजमतुल्ला खान, शेख अकबर, शेख साजिद कुरेशी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा