अवकाळी वादळ पावसाचा कहर;बाबूजी महाराज मंदिर टिन शेडवर निंबाचे झाडं पडून अंदाजे ३० ते ४० व्यक्ती दबले!

 अवकाळी वादळ पावसाचा कहर;बाबूजी महाराज मंदिर टिन शेडवर निंबाचे झाडं पडून अंदाजे ३० ते ४० व्यक्ती दबले!

एकाचा मृत्यू मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता!

बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर

                 ( आसिफ खान )

पारस गावात मोठे नुकसान, बाबूजी महाराज मंदिरातील टिन शेडवर निंबाचे झाडं पडून अंदाजे ३० ते ४० व्यक्ती टिन शेड खाली दबले असून

 १०,१२ जणांना बाहेर काढण्यात यश तर एकाचा मृत्यू आणखी जखमी व मृतक असल्याची शक्यता

बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरु असताना आज 9 एप्रिल रोजी सायंकाळची घटना

जखमीना वाचण्यासाठी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी, बाळापूर पोलीस, तहसीलदार, पारस औष्णिक विद्युत केंद्रातील अग्निशमन दल

 घटनास्थळी दाखल अनेक नेते प्रकाश तायडे घटनास्थळी दाखल असून जखमींना रुग्णालयात पाठवत आहेत.

एका तासापासून गावात लाईन बंद असल्यामुळे जखमींना टिन शेड खालून काढण्यासाठी

 गावकऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु असून यामध्ये तीन सेट खाली दबून ७ मृत्यू, १४ रेफर बाळापूर

 उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी नुकतीच माहिती दिली आहे.

बाळापूर पारस व शेळद फाटा पारस रोडवर सुद्धा झाडं कोसळल्याने ऍम्ब्युलन्स पोहचण्यात येत आहेत अडचणी.

पारस घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आरोग्य यंत्रणा पोलिस यंत्रणा सजग मदत

 कार्याला गती द्या आमदार रणधीर सावरकर यांना घटनास्थळी पाठवून ताबडतोब माहिती व मदत कार्याची माहिती घेण्यास सांगितले जिल्हा

 प्रशासनाला आदेश पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची अयोध्ये वरून आदेश मानवता

 कार्याला गती द्या महसूल पोलीस यंत्रणा निर्देश



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?