इंसानियात जोडो अभियान रॅली पोहचली अकोल्यात
इंसानियात जोडो अभियान रॅली पोहचली अकोल्यात (Asif khan) इंसाफ लाओ देश बचाओ,भारत वासियो नफरत मिटाओ सर्वधर्मीय धर्मगुरू बसले मांडीलामांडी लावून एकाच विचारपीठावर अकोला ---देशात जातीय दंगली उसळण्यासाठी एक जातीवाचक ठिणगी महत्वाचे काम करते याचा फायदा देशातील राजकिय लोक करीत असतात मात्र सर्व धर्मात भाईचारा ,बंधुता आणि शांतता नांदावी अशी शिकवण सर्वच धर्मांच्या संस्थापकांनी आणि त्या त्याधर्मांच्या धर्मग्रंथात लिहून ठेवली आहे मात्र तरीही जातीयवाद अधूनमधून उफळतच असतात असे प्रकार पूर्णपणे थांबले पाहिजेत यासाठी नागपूर येथील मुफ्ती सलीम यामनी चाऊस यांनी इंसानियत अभियान रॅली काढून गढूळ होणारे धार्मिक वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला त्यानुसार शिवजयंती दि 19 फेब्रुवारीला नागपूर येथून रॅली प्रारंभ केली असून ही रॅली आज दि 22 फेब्रुवारी रोजी अकोल्यात आली असून सर्वधर्मीय लोकांच्या मन...