पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या पंधरा दिवसीय कार्यक्रमाची यशस्वी सांगता
बीड प्रतिनिधि : मुदस्सिर बागबान (पटेल 82 न्यूज़) आरोग्य, सुरक्षा, नशामुक्ती, वृक्षारोपण आदींवर मान्यवरांनी केले मार्गदर्शन बीड (प्रतिनिधी) - शहरातील मल्टीपर्पज मैदानावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या पंधरा दिवसीय कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. यात आरोग्य, सुरक्षा, नशामुक्ती, वृक्षारोपण आदींवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शहरातून मॅराथॉन रनिंग रॅली ही काढण्यात आली. शहरातील मल्टीपर्पज मैदानावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने 16 ते 30 नोव्हेंबर या पंधरा दिवसात जनसामान्यांसाठी लाभदायक ठरेल असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. यात प्रामुख्याने आरोग्य विषयक कार्यक्रमासह कराटे, योगा, लाठी, लॉन्चर, सुरक्षा बचाव इत्यादींचे प्रात्यक्षिक उपस्थितांना मंचावर करून दाखविण्यात आले. मानवाला नशा कशाप्रकारे पोकळ करून टाकतो. ज्यामुळे नशेखोर व्यक्तीसह त्याच्याशी संबंधित अन्य जणांनाही त्रास सहन करावा लागतो. याबाबत ही मोठ्या पोटतिडकीने मार्गदर्शन करण्यात आले. झाडे लावणे व झाडे जगवणे किती महत्त्वाची आहेत याची महती पटवून देताना झाडांविषयी इत्त्यंभूत माहिती विषद करण्यात आली. या क...