पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चोरांचा बंदोबस्त करा अथवा तीव्र स्वरूपाचे आंदोलन... चा इशारा प्रहार जनशक्ती पार्टी ने आज दिला आहे

इमेज
जळगाव अमीर पटेल रावेर तालुक्यातील चीनावल परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची व संसाधांची होत असलेली चोरी व जाळपोळ करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे या प्रकरावर्ती आडा बसवा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे आव्हान आज निवेदनाद्वारे रावेर तहसील कार्यालय या ठिकाणी केलें याला जबाबदार प्रशासन असेल सदर बाबतीत या बदल चे निवेदन आज तहसीलदार मॅडम यांना दिले..* शेतकरी वर्ग अहोरात्र आपल्या घामाने शेती सिंचित आहे आणि कष्टाची भाकर खात आहे corona चे संकट डोक्यावर असून पण शेतकरी जोमाने काम करतं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हाथ भार लावत आहे अश्या परिस्थितीत शेतकरी आपला माल उघड्यावर्ती ठेवून आपल्या शेतमालाचा सट्टा लावत असून अश्या परिस्थिती मध्ये जर शेतकरी वर्गाचा माल आणि संसाधनांची हानी काही गुंड प्रवृत्तीचे लोक करीत असतील तर त्यांना त्वरित आळा घाला नाहीतर आजचे निवेदन उद्याच्या आंदोलन मध्ये बदल करेल असा ठोक इशारा आज प्रहार जनशक्ती पार्टी रावेर शहर यांनी दिला या ठिकाणी उपस्थीत  *श्री राजेन्द्र रामदास महाजन* जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी *श्री सुरेश चींधू पाटिल*...

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल जागतिक मराठी दिवस साजरा., चिमुकल्यांचा जल्लोष.

इमेज
एरंडोल - नितिन ठक्कर ग्रामीण उन्नती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक मराठी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे ,या प्रार्थनेचे करण्यात आले, तसेच इयत्ता६ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा परिधान करून अतिशय सुंदर असे विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. मराठी च्या पाठ्यपुस्तकावर आधारित इयत्ता पहिली ते आठवीच्या  विद्यार्थ्यांनी  कविता तालासुरात सादर केले. कुमारी , दीप्ती पाटील, स्वरा पगार, स्नेहल महाजन, केवल वालडे यांनी राजभाषा दिवस  याबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली . तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती वडगावकर मॅडम यांनी प्रास्ताविक करून राजभाषा मराठी दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले, तसेच वि . वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज)   यांच्या जयंती निमित्त त्याच्या साहित्य संपदे विषयी माहिती दिली.माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  अंजुषा विसपुते व संस्थेचे अध्यक्ष सचिन भाऊ विसपुते यांनी  चिमुकल्या विद्...

न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल २८फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस दिवस समारोह संपन्न झाला

इमेज
  एरंडोल नितिन ठक्कर एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान  दिवस समारोह दि.२८/०२/२०२२ रोजी संपन्न झाला या कार्यक्रमा प्रसंगी प्रथम शाळेच्या प्रिन्सिपल  सरला विंचूरकर  यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते तर उप प्रिन्सिपल सरीता पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे विज्ञान  विभाग प्रखुक राधा बोरसे यांनी मांडले व या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख अतिथीच्या हस्ते माता  सरस्वती  तसेच डाँ सी व्हि रामण यांच्या  प्रतीमेचे पूजन करुन करण्यात आले या वेळी  विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे व डा़ँ सी व्ही रामण यांच्या बद्दल विशेष माहीती सांगितली तसेच काही विद्यार्थ्यानी डाँ सी व्ही रामण यांची वेषभुषा केलेली होती यात प्रणव महाजन राज चव्हान योगेश्वरी हे विद्यार्थी होते तसेच या वेळीशाळेत विज्ञान प्रदर्शन ही भरवण्यात आले होते विद्यार्थ्यानी आपले प्रोजेक्ट बनवलेले होते त्यात व्ह्याकुम किलनर ए टी एम मँगनेटीक लेवल ग्लो...

यावल तालुक्यात पतीने केला पत्नीचा खून, तालुक्यात खळबळ :

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथील 65 वर्षे पत्नीचा 68 वर्षीय पतीने खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होण्याचे कार्यवाही सुरू असून पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर मयत महिलेचा मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. थोरगव्हाण ता. यावल येथील प्रकाश पांडुरंग पाटील यांनी रविवारी  सायंकाळी आपल्या पत्नीची झालेल्या किरकोळ वादातून पत्नी इंदुबाई प्रकाश पाटील वय 65 हिच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर वार करीत ठार केले या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली, रक्तबंबाळ अवस्थेतील इंदुबाई पाटील यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले व तेथून पुढील उपचारासाठी जळगाव नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला दरम्यान यावल पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक फौजदार नेताजी वंजारी, सुशील घुगे, भूषण चव्हाण आदी पथकासह गावात दाखल झाले पोलिसांनी प्रकाश पांडुरंग पाटील यांना ताब्यात घेतले आहे पुढील कार्यवाही सुरू आहे

यावलचे तहसीलदार महेश पवार कोरोना बाधित :

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल यावल : दि.२४ येथील तहसिलदार महेश पवार यांना कोरोनाची बाधा झाल्याची तपासणी समोर आले आहे . गेल्या काहि दिवसापासून त्यांची प्रकृती खराब होती व कोरोना संदर्भातील लक्षणे त्यांना जानवत होते म्हणून त्यांनी स्वता ग्रामीण रुग्णालयात आपली तपासणी केली तेव्हा त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे .

पिंपळकोठा जवळ अपघात ४ ठार.

इमेज
एरंडोल प्रतिनिधी - नितिन ठक्कर तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली . याबाबत माहिती अशी की , एरंडोलकडून जळगावकडे जात असलेल्या कार क्रमांक ( एमएम १ ९ सीझेड ७३६० ) पिंपळकोठ्याजवळ पुढे जात असलेल्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कार मधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहे . दरम्यान मयताची अद्याप नावे कळू शकली नाही . हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते . क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली .

एरंडोलच्या उच्चशिक्षित विवाहितेचा 20 लाखासाठी शारिरीक, मानसिक छळपती, सासू, सासरा, दीर, चुलतसासू-सासरा यांचेविरूध्द पोलिसांत तक्रार दाखल-संताप

इमेज
एरंडोल (प्रतिनिधी) - नितिन ठक्कर  येथील उच्चशिक्षित माहेरवाशिण असलेल्या विवाहीतेचा वीस लाखासाठी शारिरीक, मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल उच्चशिक्षित, परदेशात नोकरी करणार्‍या पतीसह सासू, सासरा, दीर, चुलत सासरा, चुलत सासू (सर्व रा. मालेगांव) यांचेविरूध्द एरंडोल पोलिसांत तक्रार दाखल केली असून योग्य न्याय मिळावा, संबंधितांना कडक शासन व्हावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अतिशय संतापजनक घटना असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.  यासंदर्भातील पोलिसांनी दिलेली आणि समजलेली माहिती अशी की, एरंडोल येथील रहिवासी संजय पाटील यांची मुलगी विशाखा (सध्या नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत) चा विवाह मालेगांव येथील उच्चशिक्षित हितेश जगन्नाथ निकम याचेशी 19 मार्च 2019 ला नाशिक येथे मोठ्या थाटामाटात (हॉटेल-लॉनमध्ये सासरच्या इच्छेनुसारच) झाला होता. यासाठी संजय पाटील यांनी विवाह खर्च, सोने-दागिने, मानपान यासाठी सुमारे 25 लाख रूपये खर्च केले होते. विशाखाचा पती हितेश परदेशात मोठ्या कंपनीत, चांगला पगार, नोकरीस असल्याने आणि लग्नानंतर प...

कासोदा येथे मौलाना आझाद स्मृति दिवस साजरा

इमेज
एरंडोल प्रतिनिधी - नितिन ठक्कर         कासोदा येथील मौलाना आझाद विचार मंच तर्फे मौलाना आझाद स्मृति दिवस साजरा करण्यात   आला. मौलाना आझाद यांची प्रतिमेला दैनिक देशदूत चे प्रतिनिधी यु ,टी  महाजन सर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. प्रतिक जाधव व यु टी  महाजन सर यांनी मौलाना आझाद विषयी आपले मनोगत व्यक्त केले.  प्रज्ञा न्यूज महाराष्ट्र चे संपादक प्रतिक जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शब्बीर गुप्‍ता, रजा केबलचे प्रोप्रायटर शेख मुश्ताक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला  येथील नामवंत पैलवान मोइन अली मूख्तारअली यांनी जळगाव जिल्ह्यात व राज्यात कुस्त्यांची दंगल मध्ये विजय मिळवला यानिमित्ताने त्यांच्या सत्कार पत्रकार यु ,टी महाजन सर व राजाभाऊ मंत्री पतसंस्था चे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सलाउद्दीन अलाउद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आला सूत्रसंचालन व प्रास्ताविक मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा संघटक नुरुद्दीन  मुल्लाजी यांनी केले  अब्दुल सत्तार जनाब, मनसुर पठाण, निसार हाजी शेख मुसा, मुजफ्फर अली ,अब्दुल कादर, रियाजउद्दिन स...

मनोज माहेश्वी व राहुल पाटील यांचा मनसेत प्रवेश

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल दि. २१ रोजी जळगाव येथे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँड किशोर साहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पक्षाचे उपाध्यक्ष राकेश जी पेडणेकर जनहित कक्ष व विधी विभाग  नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे जनहित रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष  चेतन अढळकर यांच्या उपस्थितीत यावल  येथील आयटी इंजिनियर राहुल पाटील व सामाजिक कार्यकर्ते मनोज माहेश्वी यांचा मनसेत प्रवेश झाला त्या ठिकाणी उपस्थित जळगाव जिल्हाध्यक्ष अँड जमील भाऊ देशपांडे जनहीत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक सय्यद संदीप मांडोळे यावल येथील शहराध्यक्ष किशोर नन्नवरे श्याम पवार अजय तायडे गौरव कोळी अनिल सपकाळे गजेंद्र माळी कुणाल बारी रस्ते व आस्थापना चे जिल्हा संघटक राजेंद्र निकम व मुक्ताईनगर चे अतुल जवरे रावेर मुक्ताईनगर यावल चे असंख्य उपस्थित होते

*खडके बु! येथे कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळुन शेतकर्याची आत्महत्या..!*

इमेज
एरंडोल: प्रतिनिधी /नितीन ठक्कर एरंडोल तालुक्यातील खडके बु! येथील हिम्मत फकीरा पाटील (वय५४वर्षे) यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळुन राहत्या घराच्या छतास असलेल्या लाकडी दांड्याला दोरीने गळफास घेऊन आपली जिवनयाञा संपवल्याची घटना सोमवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  याबाबत भरत संतोष पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. हिम्मत फकीरा पाटील यांच्याकडे ४बिघे शेतजमीन असुन लागवड केलेले कांदा पिक समाधानकारक नसल्याने त्यांनी त्यावर रोटा फिरवला व कपाशिचे उत्पादन देखिल अत्यल्प आले.  त्यांच्याकडे वि.का.स.सोसायटीचे असलेले ५०हजार रूपयांचे कर्ज कसे फेडावे..?   ही विवंचना त्यांना ञस्त करीत होती.  आधीच तुटपुंजी शेतजमीन त्यात नैसर्गिक संकटाचे सावट या कारणास्तव कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा कसा पुढे हाकावा..? व कर्जाची परतफेड कशी करावी..? अश्या दुहेरी संकटातुन बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नसल्यामुळे या शेतकर्याने मृत्यूला आलिंगन दिले.  त्यांच्या पश्चात पत्नी,१मुलगा,२मुली,जावई,सुन व नातवंडे असा परीवार आह...

तज्ञ संचालक पदी ॲड.देवकांत बाजीराव पाटील**जय नारायण मर्चंट को.ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यावल यांच्या तज्ञ संचालक पदी ॲड.देवकांत बाजीराव पाटील यांची निवड नियुक्ती*

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल               विरावली तालुका यावल येथील रहिवासी ॲड.  देवकांत पाटील यांची जय नारायण मर्चंट को .ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड यावल  यांच्या तज्ञ संचालक पदी दिनांक 21/01/2022  रोजी निवड करण्यात आली.  या संस्थेचे कार्यक्षेत्र यावल तालुका आहे संस्थापक चेअरमन  राजेश राणे ,व्हा. चेअरमन रवींद्र पाटील व सर्व संचालक मंडळ  यांच्या  सर्वानुमते ॲड.देवकांत बाजीराव पाटील  यांची निवड करण्यात आली पाटील यांचे कडे  यावल तालुक्यातील युवा उद्योजक युवा राजकीय नेतृत्व  म्हणून पाहिले जाते त्यांच्याकडे यावल तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून तर विरावली  गावात ग्रामपंचायत सदस्य  तर सामाजिक  क्षेत्रात   छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष याच बरोबर  महाराष्ट्र मानव अधिकार न्याय व सुरक्षा परिषद संघटनेचे  उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तर ग्राहक संरक्षण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश  राज्य सचिव म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतांना...

एरंडोल शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी,शिंदे दांपत्य व शिवछत्रपती मित्र परिवारातर्फे गड किल्ले पोस्टर्स माहिती प्रदर्शन आकर्षण ‌.....

इमेज
एरंडोलप्रतिनिधी :  (नितीन ठक्कर ) - शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे राजे संभाजी पाटील  समाज मंडळ ,मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड ,मराठा महासंघ, छावा संघटना, जिजाऊ ब्रिगेड यांच्यामार्फत शिवजयंती उत्साहात आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी तालुका तहसीलदार सुचिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी ,अमित पाटील, प्रा.मनोज पाटील, देविदास  महाजन, आनंदा चौधरी, डॉक्टर सुरेश पाटील, अभिजित पाटील ,विजय महाजन, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव ,जगदीश पाटील ,राकेश पाटील ,शालिक गायकवाड, रवींद्र निंबाळकर, रवींद्र पाटील कुणाल महाजन ,शेखर पाटील, आर एस पाटीलउपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांचे समायोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमात आयोजकांतर्फे "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.              शहरातील बचपन इंग्रजी शाळेतर्फे शिवसृष्टी सजीव देखावा सह सवाद्य मिरवणूक धरणगाव चौफुली, बुधवार दरवाजा, मेन रोड यामार्गावर काढण्यात आली होती . सदर मिरवणुकीत संस्था अध्यक्ष प्र...

गांधी मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नूरुद्दीन मुल्लाजी सन्मानित

इमेज
एरंडोल (प्रतिनिधी) नितिन ठक्कर येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन  मुल्लाजी यांना गांधी मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या सामाजिक कार्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन होप फाउंडेशन अँड  चारीटेबल ट्रस्ट मुंबई यांचे फाउंडेशन प्रेसिडेंट एडवोकेट डॉ, शेख अहमद यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या यापूर्वीही त्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे     येथील समाज सेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन  मुल्लाजी यांना गांधी- मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा भोळे यांनी त्यांना अभिनंदन पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले दिल्या आहेत

अनुदानाच्या प्राप्ती नंतरही शालार्थ आय डी न मिळाल्याने पगारापासून वंचित असलेले शिक्षकानी बहिष्काराचे हत्यार उपसले.दहावी-बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार.

एरंडोल प्रतिनिधी - ( नितीन ठक्कर ) माध्यमिक व उच्च माध्यमिक, अघोषित शाळा निधीसह याच अधिवेशनात घोषित व्हाव्यात, तसेच प्रचलित नियमानुसार अनुदान सूत्र तत्काळ लागू व्हावे, या मागणीसाठी दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाने दिला आहे.        नाशिक येथे शिक्षक समन्वय संघाद्वारे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांना येत्या बोर्ड परीक्षेवर बहिष्काराचे निवेदन देण्यात आले. विना, अंशतः अनुदानित सर्व शाळांबाबत सविस्तर चर्चा करून न्याय मिळण्याबाबत विनंती करण्यात आली. नाशिक विभागात २० टक्के वेतनप्राप्त उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शालार्थ प्रक्रियेबाबत दिरंगाई केली जात आहे. मागील तीन महिन्यांपासून शालार्थ मान्य असलेल्या शिक्षकांची नावे ड्राफ्टमध्ये अजूनही समाविष्ट केलेली नाहीत. परिणामी, मागील सात महिन्यांचे २० टक्के वेतन थकीत आहे. जून २१ पर्यंतचा पगार ऑफलाइन पद्धतीने शिक्षकांच्या बँक खात्यात जमा झाला. मात्र, त्यानंतर अद्यापही पगार न मिळाल्याने शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच पुढील ४० व ६० टक्क्यांचा टप्प...

यावल शहरातील विस्तारित भागातील कामाची चौकशी करीता प प प्रांतांचे नगर पालिकेस पत्र

इमेज
यावल : अमीर पटेल   यावल :नगरपरिषद हद्दीत नविन वस्तीमध्ये होत असलेल्या रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे आणि पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार प्रांतांकडे करण्यात आली होती तेव्हा या तक्रारीची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे. येथील राजेश कडू महाजन यांनी फैजपूर प्रांताधिकारी ककैलास कडलग यांच्या कडे २४ जानेवारी रोजी तक्रार केली होती यात त्यांनी म्हटले होते की नगर पालिका हद्दीतील पाईप लाईन व रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे तेव्हा नविन वस्तीमध्ये केलेल्या रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाच्या कामाबाबत आणि पाईप लाईन च्या कामा गुणवत्ता तपासणी करावी व त्याचा अहवाल घेतल्या शिवाय अंतिम बील प्रदान करुन नये, किव्वा ठेकेदारास बील अदा करतांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून रितसर परवानगी घ्यावी असे त्यांनी म्हटले होते तेव्हा नुकतेच फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्र देत या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत तेव्हा म्...

यावल येथील माथाडी कामगारांनी दिले जिल्हा माथाडी कामगार कार्यालयाकडे निवेदन

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल यावल :जळगाव येथील माथाडी कामगार कार्यालयात यावल येथील माथाडी कामगारांकडून निवेदन देत. जिल्ह्यावरून शहरीभागात मक्तेदाराकडून पोहचवल्या जाणाऱ्या रेशनधान्य उचल वाहतुकीचे हमालीचे काम स्थानिक माथाडी कामगारांकडूनचं केले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातील शासकिय गोदामा वरिल माथाडी कामगारांनी जळगाव येथे माथाडी कामगार कार्यालयात निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की जिल्हयात शहरी भागातील विविध रेशन दुकानांवर थेट जिल्ह्यावरून रेशन मालाची वाहतूक (डिलीव्हरी) सुरु करण्यात आली आहे तर या पुर्वी या वाहतुकी करीता स्थानिक तहसिल कार्यालयाच्या गोदामावरून माथाडी स्वरुपाची कामे करण्यासाठी माथाडी मंडळाने नेमणूक केलेल्या विविध टोळयातील नोंदणीकृत माथाडी कामगारांकडून हमालीची कामे केली जायची मात्र, थेट वाहतुकीत ही कामे आता या कामगारांकडून केली जात नाहीये. तर महाराष्ट्र शासनाच्या जानेवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार वाहतूक ठेका माथाडी कामगारांच्या मजूरी लेव्हीसह मंजूर झालेला असून महानगरपालिका,नगरपालिका व नगरपरिषदा कायक्षेत्रातील रास्तभाव दुकानांवर हमाली ची कामे याचं कामगार...

तक्रार केल्याचा राग आल्याने गटविकास अधिकार्याने शिवीगाळ केल्याचा आरोप , माञ बिडीओंचा इन्कार..

  प्रतिनिधि (नितिन ठक्कर ) एरंडोल: तालुक्यातील खर्ची खु! येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते किशोर लालसींग पाटील,खर्ची (खुर्द) च्या महीला  सरपंचांचे पती दिलीप मराठे व विकास पाटील हे एरंडोल पंचायत समिती खर्ची-खुर्द येथील    घरकुल घोटाळ्याचा चौकशी अहवाल मागण्यासाठी गेले असता गटविकास अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी किशोर पाटील यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे माञ बी. एस.अकलाडे यांनी आपल्यावरील आरोप खोटा,निराधार व विपर्यस्त असल्याचा खुलासा केला आहे. ही घटना १७फेब्रुवारी२०२२ रोजी  ३ते३:३० वाजेदरम्यान घडली. किशोर पाटील यांनी १६फेब्रुवारी रोजी बी.एस.अकलाडे यांच्या कार्यशैलीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरीषद,जळगाव यांच्याकडे तक्रार केल्यामुळे त्याचा राग येऊन बि.डी.ओ यांनी मला शिवीगाळ केली असे किशोर पाटील यांचे म्हणणे आहे.  किशोर पाटील हे बि.डी.ओ. यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी एरंडोल पोलिस स्टेशन ला जात असतांना पंचायत समिती च्या काही अधिकार्यांनी त्यांची समजूत काढली.   दरम्यान..  बि.डी.ओ. अकलाडे यांनी या घटनेबद्दल दिलग...

अदिवासी विकास निधिचे यंत्रणाकडून खर्चीक अहवाल मांगवावा. प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला

इमेज
प्रतिनिधी । यावल अमीर पटेल एकात्मिक आदिवासी विकास खात्यातून दरवर्षी कृषी,वीज मंडळ,जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम, अशा विविध ठिकाणी विकासात्मक धोरण अवलंबण्या साठी मोठ्या प्रमाणात निधी वळवला जात असतो,मात्र पुढे त्या निधीचे काय होते ? तो योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात वापरला जातो अथवा नाही,त्याचा पाठपुरावा होत नाही किंवा त्या - त्या विभागाचे अधिकारी त्यांचा आढावा इकडे सादर करीत नाहीत,यापुढे संबंधित खात्याने निधी वापराचा आढावा आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या बैठकीत जातीने हजर राहून द्यावा,अन्यथा हा निधी देणे बंद,करा तसा ठराव आजच करा अशा सुचना आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बारेला यांनी केल्या ते यावल येथील प्रकल्प समितीच्या आयोजित बैठकीत बोलत होते.  शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे गुरूवारी प्रकल्प समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत बोलतांना डॉ.चंद्रकांत बारेला यांनी प्रकल्प कार्यालयाच्या कर्मचारी वर्गांना शिस्त लावण्यापासून सुरुवात करीत,सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी आधी अजेंडा देण्याची व त्या अजेंड्यावर मिटिंग मध...

साकळी येथील २१ वर्षिय तरुणाची गळफास घेवून आत्महत्यायावल प्रतिनिधि अमीर पटेल

इमेज
यावल : दि. १७ तालुक्यातील साकळी येथील राहत्या घरात एका तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज दि.१७ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आले . आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही . मोहम्मद इसा तडवी ( वय २१ ) रा .साकळी  असे मयत तरुणाचे नाव असून  सदर घडलेल्या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सविस्तर माहिती अशी की, मोहम्मद तडवी  हा आई,वडील, दोन भाऊ यांच्या सह साकळी येथील इंदिरा नगर भागात  वास्तव्याला आहे . आई,वडिल तसेच लहान दोघ भाऊ यांच्यासह  मोहम्मद हा मजुरी करून घरातील चूल पेटवण्या साठी मदत करत होता. दि.१७ फेबुवारी वार गुरुवार रोजी आई,वडिल,भाऊ हे सर्वजण मोल मजुरीच्या कामाला गेले असतांना मोहम्मदने आपल्या  घरात साडी गळ्याला बांधून घराच्या छताच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती. दुपारच्या सुमारास साडेतीन वाजेच्या सुमारास लहाण भाऊ हमीद हा जेवणासाठी घरी आल्यावर त्याने मोठा भाऊ मोहम्मद हा घरात लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पाहिले व आजु बाजूला आरडाओरड करून लोकांना बोलविले असता लोकांनी बघितले असता तो मृत असल्याचे निर्दशनास आले. या घटनेची ...

कोरपावली येथे सरपंच विलास नारायण अडकमोल आयोजित संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ निराधार, निवृत्ती वेतन योजणांचा एकदिवसीय कॅम्प मा. प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली संपन्न.*

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल दि. १६ सविस्तर वृत्त असे की  तालुक्यातील कोरपावली येथे माता रमाई जयंती व ग्राम पंचायत मध्ये सरपंच पदी निवडुन आल्याचे वर्षपूर्ती निमित्ताने कोरपावली गावात सरपंच विलास नारायण अडकमोल आयोजित संजय गांधी,  इंदिरा गांधी, श्रावण बाळ निराधार, निवृत्ती वेतन योजणांचा एकदिवसीय कॅम्प ठेवण्यात आला होता. त्यात अनेक विधवा, निराधार, वृद्ध महिला व पुरुषांचे प्रकरणे हे समिती अध्यक्ष मा. शेखर पाटील यांनी स्वतः तपासणी करून त्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या कॅम्प मध्ये होत असलेल्या गरीब आदिवासी लोकांचे कामे बघून त्या लोकांनी संयोजक व त्यांच्या पूर्ण टीम चे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. प्रभाकर आप्पा सोनवणे हे होते.  कार्यक्रमाला जि प गटनेते मा.प्रभाकर आप्पा सोनवणे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष मा. शेखर पाटील, संजय गांधी समितीचे सदस्य संदीप भैय्या सोनवणे, योगिता देवकांत पाटील, कोरपावली उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, दहिगाव उपसरपंच किशोर महाजन, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशन रावेर लोक...

बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचा जळगाव जिल्ह्यात विस्तार विविध तालुक्यातील पदाधिकारी जाहीर प्रतिनिधि यावल अमीर पटेल

इमेज
प्रतिनिधि यावल अमीर पटेल  जळगाव दि.१५ वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन जळगाव जिल्ह्याचा मा.ना. एकनाथजी शिंदे व मा.ना गुलाबराव पाटील आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंगेशजी चिवटे यांच्या सुचनेनुसार वैद्यकीय मदत कक्षाचा विस्तार आज करण्यात आला. जळगाव जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी आणि जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे यांनी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ. जयश्रीताई महाजन, जळगाव महापालिकेचे जेष्ठ नगरसेवक इब्राहीम पटेल, नगरसेवक गणेश सोनवणे, शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख शोभाताई चौधरी, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी सारा हॉस्पिटलचे डॉ. मिनाज पटेल, डॉ. रागिब जहागिरदार, सह-समन्वयक भावेश ढाके, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहर व जिल्हा पदाधिकारी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले.

यावल शहरात कॉंग्रेस पार्टी तर्फे आयोजित डिजीटल मेंबर शिप सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात :

इमेज
यावल दि.१५ अमीर पटेल महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मा. श्री. आमदार शिरीष दादा चौधरी आणि, जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीपराव पवार यांच्या आदेशाने यावल शहर काँग्रेस कमिटी चे शहराध्यक्ष कादिर खान यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित डिजिटल मेम्बरशीप सद्स्य नोंदणी अभियान तालुका अध्यक्ष मा. श्री. प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि इंटक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री. भगतसिंग बापू पाटील, फैजपूर न. पा. गटनेते श्री. कलिम भाई मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकी संघ येथे सदस्य नोंदणी राबविण्यात आले. यावेळी मुख्य नोंदणी कर्ता श्री. अजय बढे, कोरपावली सरपंच श्री विलास अडकमोल, माजी नगरसेवक पुंडलिक बारी, जिल्हा उपाध्यक्ष अनू. जाती जमाती श्रीमती चंद्रकला ताई इंगळे, सद्दाम शाह, शहर उपाध्यक्ष श्री. अनिल जंजाळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष श्री. सैय्यद इखलियास, अल्पसंख्याक शहराध्यक्ष श्री. रहेमान खाटीक, सेवा फाउंडेशन शहराध्यक्ष नइम शेख, नगरसेवक श्री. समीर खान, विक्की गजरे, पुंडलिक महाराज, प्रदीप पाटील, शेक सकलेन, शेक अजहर, विनोद सोनवणे,...

शिरसाड येथे यावल न्यायालयाच्चा वतीने विधि सेवा समिती कडून कायदेविषयीक मार्गदर्शन शिबिर सपन्नप्रतिनिधी । यावल अमीर पटेल

इमेज
वाढती बाल लैंगिक गुन्हेगारी हा समाजा करीता चिंतेचा विषय आहे.तालुक्यात बालकांवर अनेक ठिकाणी लैगीक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत असे प्रतिपादन यावल न्यायालयाचे सह दिवानी न्यायधिश व्ही. एस. डामरे यांनी केले ते तालुक्यातील शिरसाड गावात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात बोलत होते. शिरसाड ता. यावल येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी सकाळी ९.३० वाजता तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले या शिबीराचे उद्घाटन दिपप्रज्वलन यावल न्यायालयाचे सह दिवानी न्यायधिश व्ही.एस.डामरे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमास ॲड. ए. एम. कुलकर्णी, यांनी बाल लैगीक अत्याचार पोस्को कायदयासंबंधी माहिती दिली, त्यानंतर अॅड. डी.आर. बावीस्कर यांनी बाल लैंगिक अत्याचार हे समाजाला लागलेले किड असुन त्याचे समुळ उच्च्याटन व्हावे असे आवाहन केले. बाल लैंगिक अत्याचार कायद्यात काय शिक्षेची तरतूद आहे याचेही त्यांनी माहिती दिली. अॅड ए आर सुरळकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा व निगोशिएबल इंस्टु मेंट अॅक्ट संबंधी माहिती दिली. तसेच महिलांचे अधिकार त्यांनी समजावून सांगितले. तसेच सहदिवानी न्याय...

ग्रामिण भागातील चर्मकार बांधवांची यावल कृषी उत्पन्न बाजार समिती येथिल बैठक संपन्न दि. १५ अमीर पटेल

इमेज
बैठकिचा विषय असे की, स्थानिक पातळीवर चर्मकार बांधवांच एक मजबूत संघटन असाव आणि हे संघटन संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा प्रचार प्रसार तर करेलच पण त्या पलीकडे जाऊन संघटनेला एक आगळ-वेगळ रूप देण्याचा प्रयत्न होईल, समजावर कुठलेही अत्याचार झाले, त्यावर वाचा फोडण्याच काम संघटने कडून होईल.. बैठकीला हजर असलेले व्यक्ती.. अजय तायडे, रविंद्र  तायडे, भरत तायडे, नरेंद्र तायडे, विजय तायडे, किसन तायडे, अशोक तायडे, संतोष तायडे.. चंदनकर सर आणि मधूकर डोळे प्रमुख उपस्थित होते .

सरकारने वाईन विक्रीच्या धोरणाबद्दल जनतेला विचारून निर्णय घेण्याचे मान्य केल्यामुळे 14 फेब्रुवारी पासून सुरू होणारे उपोषण स्थगित...*यावल दि.14 अमीर पटेल

इमेज
राळेगणसिद्धी परिवाराने 45 वर्षापूर्वी गावातील दारुभट्ट्या बंद केल्या.तसेच संपूर्ण गाव दारुमुक्त करून व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती सुरू केली होती.त्यानंतर 1995 पासून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा दारू आणि व्यसनाधीनतेला नेहमीच कडाडून विरोध राहिलेला आहे. या विषयावर अनेक आंदोलनेही झालेली आहेत.त्या आंदोलनातून महिलांच्या ग्रामसभेद्वारे दारुबंदीचा कायदा, ग्रामरक्षक दलाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे.       नुकताच 27 जानेवारी 2022 रोजी राज्य मंत्रीमंडळाने वाईन विक्रीसंबंधी एक निर्णय घेतला. त्यानुसार सुपरमार्केटआणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचे धोरण असल्याचे वृत्त समजले.हा निर्णय समाज,तरुण वर्ग आणि संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने घातक असल्याने 31जानेवारी रोजी पत्रकार परिषद व प्रेसनोटद्वारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध करण्यात आला. वास्तविक लोकशाहीमध्ये मंत्रीमंडळाने असे निर्णय लोकांना विचारून घेतले पाहिजेत.कारण लोकशाही ही लोकांनी,लोकांची, लोकांसाठी,लोकसहभागातून चालवलेली असते.यापूढील काळात सरकारने निर्णय घेताना जनतेला ...

चोरीचे प्रयत्न करणाऱ्या रात्रीच्चा गस्त वाढवा पोलीस अधिक्षकांना निवेदन यावल (अमीर पटेल )

इमेज
यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात  वाढले असून यावल पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याकामी तसेच चोरट्यांना लगेच तात्काळ चौकशी करून अटक करावी अशी मागणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) साहेब  डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन  जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस सेवा फौंडेशन जलीलदादा पटेल,रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दामसेठ शाह, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांनी केली आहे सदर भेटीत लवकरात लवकर चौकशीचे आदेश देऊन चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस निरीक्षक यांना देण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्ह्यात चोऱ्या व घरफोडया रोखण्यासाठी ग्रामसुरक्षादल रात्रीची गस्त म्हणून स्थापन करण्याची संकल्पना पूर्वपदावर असल्याचे सदर भेटीत आश्वाशीत केले💐

निधन वार्ता *साबिरा बी पटेल*

इमेज
साबिरा  बी रज्जाक पटेल निंभोरा बु ता रावेर येथील मोहम्मदी नगर येथील रहिवासी साबिरा बी रज्जाक पटेल  वय ६० यांचे दि.०४/०२/२०२२ रोजी रात्री १०:०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले  असून ते  केळी व्यापारी हारून  पटेल व सलीम पटेल यांचे बहिण होत. त्यांची अंत्ययात्रा आज दि.०५/०२/०२२ रोजी  सकाळी ११:००वाजता राहत्या घरून निघेल

दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराच्या ताब्यातील टीव्ही,फ्रीज, मोबाईल ईत्यादी मुल्यवान वस्तू तक्रारदारास परत. यावल पोलिसांची सतर्कता.

इमेज
यावल दि.५( अमीर पटेल )अवैध सावकारी प्रकरणात यावल पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणातील यावल शहरातील दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराच्या ताब्यातील जप्त केलेला मुद्देमाल यावल न्यायालयाच्या आदेशानुसार टीव्ही,फ्रीज,मोबाईल ईत्यादी मुल्यवान वस्तू तक्रारदारास परत केल्या.या कारवाईमुळे यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.     आर्थिक अडचणीत असलेल्या एका गरीब नागरिकाने यावल शहरातील एका दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराकडून 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते या रकम व्याजापोटी सावकाराने 1 लाख 35 हजार रुपये अव्वाचे व्याज वसूल केल्यावर सुद्धा सावकाराने तारण ठेवलेले टिव्ही,फ्रिज,मोबाईल,परत न करता पुन्हा व्याज वसुलीची धमकी देत होता सावकाराच्या या मनमानी बेकायदेशीर कृत्यास तक्रारदार वैतागला होता त्यामुळे त्यांनी यावल पोलीस स्टेशनला यावल पोलीस स्टेशनला तक्रार केली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी व त्यांच्या पथकाने चौकशी कारवाई करत सावकाराच्या घरातून वरील वस्तू ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता आणि आहे.या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त मुद्देमाल दहीगाव...